top of page

   व्हिजन आवाज कार्यशाळा (बॅच क्रमांक २०)  

  Vision Voice Culture Workshop (Batch 20) 

 

शनिवार-रविवार २५-२६ फेब्रुवारी २०२३

प्रबोधन प्रयोग घर (AC), श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये, केदारनाथ मंदिर मार्ग, नेहरुनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई ४०००२४.

१) सदर कार्यशाळा प्राथमिक स्तरावरील असून सकाळी ९ ते सायं. ७ या वेळेत प्रत्येकी चार तासांच्या एकूण ४ सत्रांमध्ये होईल. दमछाक न होता दोन दिवसांत १८ तासांचा अभ्यासक्रम हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे.

२) १५ वर्षांवरील कोणालाही या कार्यशाळेत सहभागी होता येईल. प्रत्येक सहभागीकडे वैयक्तिकरित्या लक्ष देण्याचा प्रयत्न असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर सहभाग संख्या अत्यंत मर्यादित राहील. कार्यशाळेत शिकवण्याचे मुख्य भाषा माध्यम मराठी असेल. मात्र अभ्यास व संवादासाठी इंग्लिश, हिंदी व मराठी या तिन्ही भाषा असतील.

 

३) एकूण १८ तासांच्या या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क रु. ६४०० /- (रुपये सहा हजार चारशे मात्र) राहील.

- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता प्रवेश शुल्का मध्ये २०% टक्के सवलत! मात्र त्याकरिता महाविद्यालयीन ओळखपत्र जोडणे आवश्यक. या शुल्कामध्ये दोन्ही दिवसांचे दुपारचे जेवण, दोन वेळेचा नाश्ता व चहा, मिनरल वॉटरची बाटली आणि अभ्यास साहित्य तसेच कॉन्फरन्स पॅड व पेन आदी साहित्याचा सामावेश असेल. मात्र या अभ्यास साहित्यामध्ये सीडी / डिव्हीडीचा सामावेश नाही.

४) प्रवेश निश्चितीकरता अर्जासोबत संपूर्ण प्रवेश शुल्क भरलेले असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जाच्या शेवटी नमूद केलेल्या बँक तपशीलाप्रमाणे प्रवेश शुल्क जमा करून Transaction ID किंवा Bank Reference Number अर्जामध्ये नमूद करावा. 

प्रवेश शुल्कासहित अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख : २१ फेब्रुवारी २०२३

५) नाटक, चित्रपट, मालिका या अन्य कोणत्याही माध्यमात काम वा संधी इ. कोणतेही आमिष आम्ही दाखवत नाही. मात्र एखाद्याच्या आवाजामधले, अभिनयामधले गुण ओळखून त्यांना चांगल्या ठिकाणी संधी देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे.

 

६) प्रवेशसंख्या अत्यंत मर्यादित असल्याने एखाद्या व्यक्तीचा सहभाग निश्चित झाल्यानंतर कोणत्याही कारणाने सहभाग रद्द झाल्यास, जमा केलेल्या प्रवेश शुल्काच्या रकमेचा परतावा मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

 

७) सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

(विशेष सूचना : प्रवेश शुल्क भरल्याची बॅंक पावती, स्वतःचे छायाचित्र आणि महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून प्रवेश घेत असल्यास महाविद्यालयीन ओळखपत्र visionvoicenact@gmail.com या मेलवर पाठवावे.)

 

संपर्क : ८८९८२८२६५५ (प्रसाद)

व्हिजन आवाज कार्यशाळा (बॅच क्रमांक २०)

शनिवार-रविवार

२५-२६ फेब्रुवारी २०२३

 प्रवेश अर्ज 

Vision Bank details.jpg

Thanks for registering to our workshop. See you there!

आवाजतज्ञ श्रीनिवास नार्वेकर 

यांची दोन दिवसांची व्हिजन आवाज कार्यशाळा कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे 'कोंकण नाऊ' चित्रवाहिनीने आयोजित केली होती.

त्याचदरम्यान वाहिनीवर प्रसारीत झालेली मुलाखत!

IMG_749
bottom of page