केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या प्रायोगिक रंगकर्मींसाठी नेहरूनगर, (कुर्ला) पूर्व येथे पल्लवी फाउंडेशन आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन प्रयोग घराची उभारणी करण्यात आलेली आहे.
६० आसन व्यवस्था असलेल्या या प्रयोग घरामध्ये नाटकांचे प्रयोग व तालमी, नृत्य कार्यक्रम व तालमी, ओपन माईक, स्टॅन्ड अप शो, सेमिनार, कार्यशाळा, फिल्म प्रिव्ह्यू, फिल्म प्रीमियर असे एक ना अनेक कार्यक्रम आपल्याला करता येतात. आज घडीला सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त अशा प्रकारचा हा मुंबईतील एकमेव रंगमंच आहे.
पल्लवी फाऊंडेशन
आणि
व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट संचालित
प्रायोगिक आणि हौशी रंगकर्मींसाठी हक्काची जागा...
प्रबोधन प्रयोगघर
- तुमचं आमचं प्रयोगपीठ
संकल्पना : भाऊ कोरगांवकर, श्रीनिवास नार्वेकर
मार्गदर्शक सल्लागार : विवेक देशपांडे, प्रमोद लिमये, रजनीश राणे
कला आरेखन : सुनील देवळेकर
व्यवस्थापन : निलेश कोरगांवकर, प्रसाद सावर्डेकर
संपर्क : ८८९८२८२६५५ (प्रसाद)
ई-मेल : prabodhanprayogghar@gmail.com