प्रबोधन प्रयोग घर यांच्या सहकार्याने
व्हिजन व्हॉईस एन अॅक्ट, मुंबई आयोजित
रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांची
पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती
मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा - २०२४
(वर्ष २२ वे)
*****************************************
मुंबई केंद्र
*पूर्वप्राथमिक फेरी - रविवार ४ फेब्रुवारी २०२४*
(सकाळी ८.३० ते दुपारी १.००)
*प्राथमिक फेरी - रविवार ४ फेब्रुवारी २०२४*
(दुपारी २.०० ते रात्रौ ८.००)
(स्थळ : प्रबोधन प्रयोग घर, नेहरूनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई २४)
* अंतिम फेरी - २३, २४ व २५ फेब्रुवारी २०२४ रोजी चाळीसगाव येथे!
*****************************************
-
मुंबई केंद्रावर १२ हून अधिक संघ सहभागी झाल्यास ही स्पर्धा पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक अशा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येईल.
-
दोन फेऱ्यांमध्ये स्पर्धा घेण्याची वेळ आल्यास, पूर्वप्राथमिक फेरी रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या वेळेत होईल.
-
पूर्वप्राथमिक फेरीमध्ये, या स्पर्धेसाठी निवडलेल्या २५ ते ३० मिनिटांच्या संहितेतीलच 'सर्वोत्तम १० मिनिटांच्या भागाचे' अभिवाचन करावयाचे आहे.
-
संपूर्ण सादरीकरण संहितेच्या तीन प्रती, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या नावांची यादी तीन प्रतींमध्ये पूर्वप्राथमिक फेरीवेळी सादर करावी.
-
पूर्वप्राथमिक फेरीमधून ६ संघांची निवड प्राथमिक फेरीसाठी करण्यात येईल; तर प्राथमिक फेरीतून २ संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येईल.
-
एका संघात किमान दोन व कमाल पाच स्पर्धक कलाकार असावेत.
-
या वर्षीची अभिवाचन स्पर्धा विशेषत्वाने १) एखाद्या व्यक्तीचे चरित्रकथन किंवा, २) रहस्य किंवा गूढकथा या साहित्य प्रकारांमध्ये होणार आहे. वाचन संहिता सलग नाट्यात्म अनुभूती देणारी असावी. मात्र नाटक वा एकांकिकेचे वाचन करता येणार नाही. कवितादेखील निवेदनाद्वारे संहितेच्या स्वरुपात बांधलेल्या असाव्यात. निव्वळ कवितांचे वाचन स्पर्धेमध्ये गृहीत धरले जाणार नाही.
-
या अभिवाचन स्पर्धेसाठी नव्याने लिहीलेल्या संहितांना वरील साहित्य प्रकारांचे बंधन असणार नाही. प्राथमिक फेरीमध्ये नव्या संहितेचे वाचन झाल्यास त्यासाठी ५ गुण अधिक धरण्यात येतील.
-
केवळ या अभिवाचन स्पर्धेसाठी लिहिल्या गेलेल्या नवीन संहितेसाठी अंतिम फेरीमध्ये विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. मात्र त्यासाठी तीन नवीन संहितांचा सहभाग स्पर्धेमध्ये असणे आवश्यक आहे.
-
स्पर्धेमध्ये सर्वोच्च महत्व वाचिक अभिनयाला दिले जाणार आहे. पार्श्वसंगीतासाठी वेगळे गुण असणार नाहीत.
-
नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूषा आदी घटकांना या स्पर्धेमध्ये स्थान राहणार नाही.
-
पूर्वप्राथमिक व प्राथमिक फेरीवेळी प्रवास, नाश्ता व भोजनाची सोय स्पर्धक संघांनी स्वतः करावयाची आहे. पूर्वकल्पना दिल्यास आवश्यक शुल्क आकारुन स्पर्धकांच्या नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल.
-
पूर्वप्राथमिक फेरीमधून निवडण्यात आलेल्या ६ संघांची प्राथमिक फेरी याच दिवशी (रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २.३० ते रात्रौ ८.०० या वेळेत) होणार असून त्या सादरीकरणाचा कालावधी २५ ते ३० मिनिटे राहील.
-
पूर्वप्राथमिक, प्राथमिक व अंतिम तिन्ही फेऱ्यांमध्ये तेच कलाकार असावेत.
-
प्राथमिक फेरीमध्ये पाच वैयक्तिक वाचिक अभिनयाची प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देण्यात येतील.
-
प्रवेश अर्ज संपूर्ण भरुन आणि त्यासोबतचा क्यू आर कोड स्कॅन करुन किंवा बँक खात्यावर स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु. ५००/- जमा करावेत आणि त्या व्यवहाराचे तपशील प्रवेश अर्जामध्ये नमूद करावेत. प्रवेश शुल्क भरल्याशिवाय प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
-
प्रवेश शुल्कासह प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख : ०२ फेब्रुवारी २०२४
-
संपर्क : ८८९८२८२६५५ (प्रसाद सावर्डेकर)
-
पूर्व प्राथमिक फेरीसाठी - "प्रबोधन प्रयोग घर" गुगल मॅप https://goo.gl/maps/nFjK83dVhD6YmJHf9
*****************************************
-
चाळीसगाव येथील अंतिम फेरीकरीता निवड झालेल्या संघांनी त्याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी ९६६५६२६०९२ या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.
-
अंतिम फेरीतील सादरीकरणानंतर प्रत्येकी रु. ५००/- (कमाल सात जणांसाठी) प्रवास खर्च साहाय्य म्हणून देण्यात येतील. अंतिम फेरीतील स्पर्धकांची डॉर्मेटरी स्वरुपातील निवासाची व भोजनाची व्यवस्था चाळीसगाव येथे आयोजकांतर्फे केली जाईल.
* अंतिम फेरीतील पारितोषिके :
सांघिक : प्रथम रु. १०,०००;
द्वितीय रु. ७,०००;
तृतीय रु. ५,०००;
उत्तेजनार्थ २ पारितोषिके प्रत्येकी रु. २,०००
* दिग्दर्शन : प्रथम रु. ३,०००;
द्वितीय रु. २,०००;
तृतीय रु. १,०००
* वैयक्तिक वाचिक अभिनय : प्रथम रु. ३,०००;
द्वितीय रु. २,०००;
तृतीय रु. १,०००;
उत्तेजनार्थ ५ पारितोषिके प्रत्येकी रु. ५००
* सर्वोत्कृष्ट संहिता लेखन : रु. १०००
* सर्वोत्कृष्ट समीक्षक गट : आकर्षक फिरता स्मृति चषक व प्रमाणपत्र
* सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
निमंत्रक
श्रीनिवास नार्वेकर
संचालक,
व्हिजन व्हॉइस एन अॅक्ट
प्रमोद लिमये
स्पर्धा प्रमुख,
मुंबई केंद्र
डॉ. मुकुंद करंबेळकर
अध्यक्ष,
रंगगंध कलासक्त न्यास
प्रवेश अर्ज व सविस्तर तपशील व्हिजनच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध : www.facebook.com/voicenact