top of page
_AP_0014.JPG
IMG-4104.jpg

व्यक्तिमत्व किंवा संवाद कौशल्य घेऊन कोणीही जन्माला येत नाही. हे घडत जातं संस्कार, भोवतालचं वातावरण, शिक्षण आणि आयुष्याच्या प्रवासात निरनिराळ्या टप्प्यांवर येणारे अनुभव यांच्या आधारे..व्यक्तिमत्व घडवताही येतं आणि इतरांवर आपली चांगली छापही पाडता येते.

आवाज, चेहर्‍यावरील हावभाव, देहबोली आदींच्या परिणामकारक वापराने... गरज असते ती स्वत:विषयीच्या अचूक पारखीची, आपल्यातल्या त्रुटींवर मात करण्याची किंवा त्या त्रुटींचा प्रभावी वापर करण्याची... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, मेहनतीची... आणि या सगळ्यासाठी प्राथमिक गरज आहे, व्यापक दृष्टीकोनाची -
अर्थातच 'व्हिजन'ची...

कार्यशाळा

माझा आवाज... माझी ओळख...

आपला आवाज ही आपली ओळख असते, तीच ओळख आपल्याला मजबूत करायची आहे.

     कलाकार, सूत्रसंचालक, निवेदक, काऊन्सेलर, डबिंग व व्हॉइस ओव्हर कलाकार, पत्रकार, सेल्समन, वकील, डॉक्टर्स, शिक्षक, राजकीय नेते- कार्यकर्ते आणि अगदी गृहिणीदेखील... ज्यांचा ज्यांचा बोलण्याशी आणि प्रभावीपणे बोलण्याच्या गरजेशी संबंध येतो, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी व्हिजन कार्यशाळा!

कार्यक्रम र्निर्मिती

I’m a paragraph. Double click me or click Edit Text, it's easy.

चला,वाचू या

जून २०१५ मध्ये "चला, वाचू या" ही मासिक अभिवाचन चळवळ सुरू झाली आणि आज हा मासिक अभिवाचन उपक्रम ७५ व्या पुष्पापर्यंत येऊन ठेपलाय. जुन्या जाणत्या वाचकांना त्यांच्या मनपसंत साहित्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद देणं, नव्या-जुन्या कलावंतांना, अभिवाचकांना, लेखकांना समोर आणणं, त्यांना बोलतं करणं या सगळ्याच गोष्टी साध्य होत आहेत, या चळवळीतून... ही चळवळ आहे साहित्यप्रेमींनी साहित्यप्रेमींसाठी चालवलेली....

प्रबोधन प्रयोग घर

I’m a paragraph. Double click me or click Edit Text, it's easy.

bottom of page